Fourth Shravan Somvar 26 Aug 2024

Spread the love

26 ऑगस्ट 2024 ला चौथा श्रावण सोमवार आहे. या श्रावण सोमवारला योगायोगाने गोकुळाष्टमी जन्माष्टमी सुद्धा साजरी होणार आहे .श्रीकृष्ण हा महानायक आहे. श्रीकृष्णाचे जीवन अनेक चमत्कारांनी भरलेले आहे, अनेक संकटाचा सामना श्रीकृष्णाने केला आहे. तसेच यावेळी “सर्वार्थ योग” व “जयंती योग” याच दिवशी आलेले आहे. हा खरोखर दुर्मिळ असा सुयोग आहे. या श्रावण सोमवारला जव शिव , शिवपिंडीवर वाहावयाचे आहे. जव हे सात्विक धान्य आहे. शिवपूजेत सर्वात आधी अभिषेक म्हणजे शिवपिंडीवर जल अर्पण करतात. त्यालाच जलाभिषेक म्हणतात. ही जलाभिषेकाची कृती माणसाच्या मनाची शुद्धता व समर्पण दर्शवते. सर्वार्थ सिद्धी योग असतो तेव्हा, सर्व ग्रहांची स्थिती शुभ अवस्थेत असते म्हणजे ती मंगलमय असते. त्यामुळे व्यक्तीला साधना आराधना केल्याने दैवी शक्तीची मदत मिळते. त्या मदतीमुळे पूजा, विचार, कार्य सफल होतात. श्रावण सोमवारचे व्रत केल्याने व उपासना केल्याने सुख, लाभ समृद्धी मिळते. मनोकामना पूर्ण होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. या महिन्यात सर्वांची आध्यात्मिक प्रगती अधिक होते कारण महिनाभर भक्तीमय वातावरण असते.


Spread the love

Leave a Comment

Recommended
19 ऑगस्ट 2024 ला तिसरा श्रावण सोमवार आहे यावेळी फारच…
Cresta Posts Box by CP