Third Shravan Somvar 19 Aug 2024

Spread the love

19 ऑगस्ट 2024 ला तिसरा श्रावण सोमवार आहे यावेळी फारच चांगला सुयोग आलेला आहे. कारण रक्षाबंधन सारखा पवित्र सण नेमका तिसऱ्या श्रावण सोमवारी आला आहे. इंद्र पत्नीने असुर राज बळीराजा याला राखी म्हणजे रक्षा सूत्र बांधले हेते अशी पुरातन कथा आहे. द्रौपदीनेही श्रीकृष्णाला आपला शालू फाडून पट्टी बांधण्याची कथा महाभारतात आहे ते, बहिण भाऊ होते. या घटनेपासून हा सण बहिण भावांचा म्हणून मानला जातो. या सोमवारी सर्वजण शिवाला राखी घरी किंवा मंदिरात जाऊन बांधू शकतात. उज्जैनचे लोक सर्वात आधी भगवान शिवाला राखी बांधतात, मग तो कोणताही दिवस असो. यावेळी फार चांगला सुयोग सर्वांसाठी आलेला आहे. या सोमवारी महादेव पिंडीचा अभिषेक करून मूग हे कडधान्य अर्पण करायचे आहे. त्याला शिवामूठ म्हणतात. आपण” शिवमृत्युंजय स्तोत्रम” चे पठण, वाचन करू शकतो किंवा” निर्वाण षटकम्” किंवा “पार्वती वल्लभ नीलकंण्ठाष्टकम्” पठण करू शकतो. ज्यांना वेळ कमी आहे ते अभिषेक व पूजा झाल्यावर शंकराची आरती म्हणू शकतात.


Spread the love

Leave a Comment

Recommended
12 ऑगस्ट 2024 ला दुसरा श्रावण सोमवार आहे. आजही अभिषेक…
Cresta Posts Box by CP