देवा तुझ्या नामाची काय सांगू ख्याती
भक्त तुझे दिन रात तुला भजताती
पावलासी कोणाला हे मज न ठावे
परि नामाचा जप तुझ्या मुखी सदा चाले
सन्याशाची पोरं म्हणून समाजा हिनवली
‘ज्ञानानं तुझ्या वाणी रेड्या मुखी बोलविली
चांगदेव स्वारी बसून वाघावरी आली
मुक्ताईनं तुझ्या निर्जीव भिंत चालविली
देवा आधी नैवेद्य उष्ठा का रे केला
नामदेवा हाती घास सुखी भरविला
नवलाकाचा हार देवा जनीन चोरला
समाजानं गळा तिच्या फासा आवळला
भक्तीच्या हाकेला धावूनी ओ आला
सुळाचा चाफा तुझ्या जनाईचा झाला
तुकोबाने लिहीले अभंग फेकून नदीत दिधले
इंद्रायणी माऊलीने जिवापाड संभाळले
गोरा कुंभार वेडा झाला मातीत बाळ तुडविले
तू खरा का खोटा, बाळ दुडुटुडु धावले
देवा तुझ्या नामानं लेकरू धन्य झाली
भक्तांनी तुझ्या मांदीयाळी उभी केली
–बळवंत पाडळे