मी कुणाला कळलो नाही | Me konala karale nahi

Spread the love

मी कुणाला कळलो नाही

मित्र कोण आणि शत्रू कोण
गणित साधे कळले नाही..

नाही भेटला कोण असा
ज्याने मला छळले नाही..

सुगंध सारा वाटीत गेलो
मी कधीच दरवळलो नाही..

ऋतू नाही असा कोणता
ज्यात मी होरपळलो नाही..

केला सामना वादळाशी
त्याच्या पासून पळालो नाही..

सामोरा गेलो संकटाना
त्यांना पाहून वळलो नाही..

पचऊन टाकले दुःख सारे
कधीच मी हळहळलो नाही..

आले जीवनी सुख जरी
कधीच मी हुरळलो नाही..

कधी ना सोडली कास सत्याची
खोट्यात कधीच मळलो नाही..

रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण
मी कुणाला कळलोच नाही…!
मी कुणाला कळलोच नाही…!

कवी : सुरेश भट


Spread the love

Leave a Comment

Recommended
।।श्लोक।।धरा श्रीवरा त्या हरा अंतरातें।तरा दुस्तरा त्या परा सागरातेॅ।सदा विसरा…
Cresta Posts Box by CP
Index