तू गेल्यावर फिके चांदणे. || Tu gelyavara phike candane.

Spread the love

तू गेल्यावर फिके चांदणे.


तू गेल्यावर फिके चांदणे,
घर परसूही सुने – सुके
मुले मांजरापरी मुकी अन्
दर दोघांच्या मध्ये धुके…


तू गेल्यावर घरांतदेखिल
पाउल माझे अडखळते
आणि आटुनी हवा भवतिची
श्वासास्तव मन तडफडते


तू गेल्यावर या वाटेने
चिमणी देखिल नच फिरके
कसे अचानक झाले नकळे
सगळे जग परके परके


तू गेल्यावर दो दिवसांस्तव
जर ही माझी अशी स्थिती…
खरीच माझ्या आधी गेलिस
तर मग माझी कशी गती?


बा भ बोरकर.


Spread the love

Leave a Comment

Recommended
महात्मा ज्योतिबा फुले: ( Mahatma Jyotirao Phule ): भारतीय समाज…
Cresta Posts Box by CP
Index