आई कुणा म्हणू मी

Spread the love

आई कुणा म्हणू मी

आई कुणा म्हणू मी, तुजवीण सांग आई?
इतुकेच सांगण्याला येशील का ग आई?

तोडीत ना फुलाला वेली स्वये कधीही
सोडून तू मुलाला गेलीस का ग आई?

रागावण्या तुलाही मजवीण बाळ नाही
बाळाविना तुलाही कोणी म्हणेल आई?

चुकतो असेन मी गे, म्हणतो तुला मी आई
चुकलीस तू परि का, होऊन माझी आई?

कवी – पी सावळाराम


Spread the love

Leave a Comment

Recommended
श्री राम रक्षा स्तोत्र श्रीगणेशायनम: ।अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य ।बुधकौशिक ऋषि: ।श्रीसीतारामचंद्रोदेवता…
Cresta Posts Box by CP
Index