पाचवा श्रावण सोमवार
२ सप्टें 2024 रोजी श्रावण महिन्याचा शेवटचा श्रावण सोमवार आहे. यावर्षी पाच श्रावण सोमवार आले आहेत. या सोमवारी -श्रावण सोमवार व्रत कथा किंवा शिव पुराण वाचावे. सकाळी लवकर उठून स्नान करून शिवपिंडीचा जल अभिषेक करावा मग पंचामृताने स्नान शिव पिंडीला घालावे परत जलाभिषेक करून शिवामूठ सातू वहावे नंतर बेल व फूल वाहावे. शिव व गौरीचे पूजन झाल्यानंतर. भोग दाखवावा. शिवपुराणानुसार भगवान शिवाला आवडणारे भोग म्हणजे खीर, हलवा, दही, दूध, सफेद बर्फी, भांग, पंचामृत, शहद, मालपुआ, ठंडाई, लस्सी सूखा मेवा हे अति प्रिय आहे. भगवान शिवाला मोगरा व चंपा इत्र / अत्तर फार प्रिय आहे श्रावण महिन्यात हे शिवलिंग वर चढवल्यने भोलेनाथ प्रसन्न होतात व भक्तांचे सर्व मनोरथ सिद्ध होऊन पूर्णत्वाला जातात तसेच शिवलिंग वर लौंग चढवल्याने भगवान शिव आपल्यावर कृपा करतात. क्षमा, सत्य, दया, दान, शौच, इन्द्रियसंयम, देवपूजा, अग्निहोत्र, संतोष तथा चोरी न करणे. हे या व्रताचे नियम आहेत. या व्रताचे महत्त्व :- श्रावन सोमवारला उपवासाचे पालन म्हणजे संयम, तपस्या आणि आस्थाचे प्रतिक आहे. व्रत करतांना व्यक्तीचे मनोभाव त्या त्या देवतेला समर्पित असतात. तसेच आत्मबल, आत्म तपस्या वाढून आत्म नियंत्रण वाढते व शरीराला, मनाला बुद्धिला सयमाचा लाभ मिळतो.