वळवाचा पाऊस…..

Spread the love

आला वळवाचा पाऊस
त्यात सोसाट्याचा वारा
दोन हातांनी जेल्हू किती
पडती टप टप गारा
होतो ढगांचा गडगडाट
त्यात विजेचा लकलकाट
पाहुनी आकाशात
मोर नाचे लांडोरात
भिजूनिया वाटसरू
धरी झाडाचा आसरा
पडता अंगावरी थेंब
झोंबे गार गार वारा
साचे अंगणात पाणी
मुले गाती पाऊस गाणी
होडी करुन कागदाची
पाण्यावरी सोडतात
सरला वळवाचा पाऊस
सूर्य डोकावे ढगाआड
पडता डोंगरावर किरण
थेंब करी चमचमाट
पडता वळवाचा थेंब
येई मातीचा सुगंध
मोह होई अनावर
उभा ठेवी क्षणभर

–बळवंत पाडळे

Website |  + posts

Spread the love

Leave a Comment

Recommended
पुस्तक मानवाच्या “विचारांची अमूल्य ठेव” आहे. या गोष्टीची प्रस्तावना म्हणजे—…
Cresta Posts Box by CP

Table of Contents

Index