लोभाचे फळ

Spread the love

लोभाचे फळ

                     कुंदनपुर नावाच्या नगरात गणेश शेठ नावाचे एक व्यापारी राहत होते. व्यापारामध्ये त्यांनी बराच पैसा मिळवला. परंतु ते अत्यंत लोभी,असल्यामुळे मिळालेल्या पैशात त्यांना समाधान कधीच वाटत नव्हते. ते सतत पैशाचा विचार करत असेल.कंजूसपणाबद्दल तर संबंध कुंदनपुर नगरात त्यांची ख्याती झालेली होती.

                एकदा त्यांची मोहरांची पिशवी हरवली. त्या पिशवीत शंभर मोहरा होत्या. त्यामुळे मनामध्ये ते अतिशय ते दुःखी  झालेले होते. त्यांना अन्नपाणी गोड लागत नव्हते. की कोणत्याही कामाकडे त्यांचे लक्ष लागत नव्हते. रात्रंदिवस त्यांच्या डोक्यामध्ये त्या पिशवीचाच विचार घोळत होता. त्यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नी सारखी सारखी ती पिशवीच दिसत होती. विचार करता करता आपण हरवलेल्या पिशवी बद्दल नगरात एकदा अवश्य दवंडी द्यायला हवी. असा विचार त्यांच्या मनात आला.

             ते नगराच्या दवंडी देणाऱ्या इसमाकडे गेले, दवंडी देणाऱ्या इसमाने त्यांना सांगितले, “तुम्ही पिशवी आणून देणाऱ्यास काही बक्षीस ठेवा”. म्हणजे पिशवी ज्या कोणाला सापडली असेल,तो पिशवी आणून देईल. गणपतशेठनी  त्याचे म्हणणे मान्य केले,कारण त्यांना पिशवी हवी होती. तेव्हा पिशवी आणून देणाऱ्यास सोन्याच्या दहा मोहरांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले गेले.

                   दवंडी देणाऱ्याने दुसऱ्या दिवशी थाळी वाजवून नगरभर दवंडी दिली. दवंडीवाला जोरात गावामध्ये ओरडू लागला. गावकऱ्यांनो, ऐका हो ऐका! “गणेशशेठ यांची सोन्याच्या मोहरांनी भरलेली पिशवी ज्या कोणाला सापडेल, जो कोणी आणून देईल,त्या व्यक्तीला दहा मोहरा बक्षीस म्हणून देण्यात येतील” “ऐका हो ऐका”

                  काही दिवसानंतर एक शेतकरी गणेश शेठजींकडे आला. त्या शेतकऱ्याला मोहरांची पिशवी नगरातील एका उद्यानामध्ये सापडली होती. त्याने ती पिशवी शेठजींना परत देली. पिशवी हातात पडताच,अगदी घाई घाईने तीओढली.मग सोडली. मोहरा मोजल्या त्या शंभर होत्या.

                ते मनातून आनंदी झाले. परंतु शेतकऱ्याची प्रशंशा केली नाही. की त्याला बक्षीसही दिले नाही. उलट ते त्याला निरोप देऊ लागले तेव्हा त्या शेतकऱ्याने  दवंडीची आठवण करून दिली व म्हणाले यांची तुम्ही पिशवी आणून देणाऱ्या व्यक्ती सोन्याच्या दहा मोहरा देण्याचे बक्षीस ठेवले होते. माझ्या बक्षिसाच्या दहा मोहरा मला पटकन द्या! मी निघतो मी माझे काम प्रामाणिकपणे केले आहे. तेव्हा माझे बक्षीस दहा मोहरा मला द्या. त्यावर शेठजी म्हणाले, वा,वा,वा बराच खाष्ट दिसतो.  अरे बाबा! या पिशवीमध्ये माझ्या एकशे दहा मोहऱ्या होत्या समजलास.तू त्या पहिलेच दहा काढून घेतल्या. मी तर आता तुझ्यासमोर मोजल्या,हे तू प्रत्यक्ष तुझ्या डोळ्यांनी पाहिलेस ना! त्यावर गरीब शेतकरी म्हणाला, शक्य नाही! गरीब आहे पण प्रामाणिक आहे. पिशवीत शंभरच मोहरा होत्या. 110 मुळीच नव्हत्या. तुम्ही आता निव्वळ थाप मारत आहात. मी ती पिशवी जशी सापडली तशीच तुमच्या कडे दिलीआहे. तेव्हा मला तुम्ही जाहीर केलेले बक्षीस द्या. जा! जा! कधीच तुला मिळणार नाही!

                 गणपतशेठ आपला आवाज चढवून म्हणाला. दहा मोहरा तू आधीच काढून घेतल्यामुळे आता बक्षीस देण्याचा प्रश्न येतोच कुठे? दोघांची बरीच बाचाबाची झाली. शेवटी दोघांनी हा वाद नगरच्या न्यायाधीशाकडे निर्णयासाठी देण्याचे ठरवले.नंतर त्यांनी ती मोहरांची पिशवी पाहण्यासाठी शेठजीला मागितली.  मोहरांनी ते पिशवी टम्म फुगलेली होती.पूर्ण भरलेली पिशवी बघून न्यायाधीश म्हणाले,या पिशवीत फक्त शंभरच मोहरा बसू शकतात. आणि शेठजींच्या तर 110 मोहरा होत्या.अगदी बरोबर 110 मोहरा होत्या.ती इतकी टम्म फुगली होती की त्यात एकही मोहर मावेना! तेव्हा न्यायाधीश म्हणाले गणपतशेठ हि तुमची पिशवी नाही? तुमच्या पिशवीत 110 मोहरा होत्या. ते पाहून गणपतशेठ खजिल झाले. त्यांनी मुकाट्याने आपली चूक कबूल केली. आणि न्यायाधीशाची माफी मागितली. शेतकऱ्याचे बक्षीस शेतकऱ्याला देण्याचे कबूल केले. ते तसे दिलेही.

               शिवाय खोटी तक्रार केल्याबद्दल सरकारी खजिन्यात गणेश शेठजींना दहामोहरांचा दंड भरावा लागला. अति लोभाचे फळ गणेशशेठजींना मिळाले,आणि खोटे बोलण्याची शिक्षाही त्यांना मिळाली. म्हणून मित्रांनो, लोभाचे फळ मिळते. अति लोभ करू नये.


 

Honeywell High-Speed 3-in-1 Type C to HDMI Adapter, PD Charging Upto100W, USB3.0 Delivers Quick Transfer Speed of 5GBPS, UHD 4K@30Hz, Universally Compatible with All Type C Devices, Aluminium Case

Blue Star 1.5 Ton 3 Star, 60 Months Warranty, Wi-Fi Smart Inverter Split AC (Copper, 5 in 1 Convertible Cooling, 4-Way Swing, Turbo Cool, Voice Command, IC318YNUS, White)

Website |  + posts

Spread the love

Leave a Comment

Recommended
तो पाऊस तो पाऊस तुझ्या आठवणींचा डोळे पाणावून गेला तो…
Cresta Posts Box by CP
Index