महर्षी चरक: आयुर्वेदाचे जनक आणि जीवनद्रष्टा

Spread the love

१. प्रस्तावना – जेव्हा रोग शरीरात नव्हे, तर मनात जन्म घेतो

आज आपण डॉक्टरांकडे जातो, गोळ्या घेतो, तपासण्या करतो. औषध घेतो आणि बरेचदा लक्षणे कमी होतात पण काही आठवड्या नंतर पुन्हा तेच लक्षणे परत तिथे निर्माण होतात. असे का होते? 

कारण डॉक्टर रोगावर, रोग बघून औषध देतात. पण रोगाच्या मूळ कारणावर उपचार करत नाही. महर्षी चरक यांनी हेच सांगितले की रोग फक्त शरीरातच असतो असे नाही, तर तो “मनात जन्म घेतो आणि शरीरात प्रगट होतो”. म्हणजेच या सगळ्यात उपचारामध्ये एक बाब हरवते.  म्हणजे – माणसाचं संपूर्ण मनोशरीर समजून घेणं. हाच दृष्टिकोन महर्षी चरकांनी हजारो वर्षांपूर्वी मांडला होता. ते केवळ वैद्य नव्हते, तर मानवी वेदनेचे अभ्यासक होते. रोगांचं मूळ केवळ ‘शरीरात’ नसून ते ‘मनात’ असतं, हे सांगणारे ते पहिले तज्ञ होते.

चरक ऋषींनी मुलत: संस्कृत मध्ये चरक संहिता लिहिलेली होती. चरक संहिता आयुर्वेदातील सर्वात जुना-पौराणिक, प्राचीन आणि प्रामाणिक व महत्त्वपूर्ण आयुर्वेदिक ग्रंथ मानला जातो. चिकित्सा क्षेत्रामधील अत्यंत महत्त्वपूर्ण योगदानामुळे चरक ऋषींना आयुर्वेदिक चिकित्सांचे जनक म्हणून ओळखले जाते.

२. महर्षी चरक यांचा परिचय

महर्षी चरक हे इतिहासातिल हृदयस्पर्शी तपस्वी होते. ते एक प्रज्ञावान तपस्वी आणि मानवतावादी ऋषी होते. ते काश्मीरच्या दरबारातील “राज्य-वैद्य” होते पण त्यांच्या कार्याचा विस्तार केवळ राजवाड्या पुरवठा मर्यादित नव्हता. तर ते जनसामान्यांच्या जीवनाशी जोडलेले वैद्य होते. आधुनिक काळात डॉक्टर हे विशेषज्ञ असतात, म्हणजे स्पेशालिस्ट असतात. ते वेगवेगळ्या अवयवांचे डॉक्टर्स असतात. जसे की हृदयाचे, पचनाचे, मेंदूचे वगैरे वगैरे. परंतु अत्यंत प्राचीन काळात सुद्धा चरक ऋषी हे एकाच वेळी शरीर, मन, आत्मा आणि पर्यावरण यांचा संतुलन बघणारे “समग्र वैद्य” होते.

महर्षी चरक हे इ.स.पूर्व ३०० ते ५०० च्या दरम्यान भारतात होऊन गेलेले एक महान वैद्य आणि तत्वज्ञ होते.

त्यांच्या कार्यामुळे “चरक संहिता” या आयुर्वेदाच्या मूलग्रंथाने जन्म घेतला, जो आजही संपूर्ण जगात वैद्यकशास्त्राच्या अभ्यासकांसाठी मार्गदर्शक आहे.

ते काश्मीरच्या राजदरबारात ‘राजवैद्य’ होते. पण त्यांनी आपल्या कार्यकाळात केवळ उपचारच केले नाहीत, तर रोग, शरीर, आहार, प्रकृती आणि मन यांच्यातील सूक्ष्म संबंध समजून घेण्याचा एक नवा मार्ग जगाला दिला.

३. चरक संहिता – आयुर्वेदाचे शास्त्रीय ज्ञान किंवा आयुर्वेदातील “अमृतमंत्र” असे अलंकारिक भाषेत म्हणू शकतो.

काय आहे चरक संहिता?

“चरक संहिता” ही आयुर्वेदाच्या तीन स्तंभांपैकी एक आहे. (सुश्रुत संहिता व अष्टांग हृदय ही दोन) ही चरक संहिता हे एक ८ भागांचं आणि १२० अध्यायांचा ग्रंथ आहे, ज्यात:

  • शरीर रचना (Anatomy)
  • धातू, दोष आणि उपधातू यांची माहिती
  • रोगांची मूळ कारणं
  • रोगनिदान आणि उपचार पद्धती
  • आहारशास्त्र
  • मन आणि शरीर यांचा संबंध
    या सगळ्यांचा सखोल विचार आहे.
  • यातील आठ खंड म्हणजे:—
  • सूत्रस्थान (सिद्धांत)
  • निदान स्थान (रोग निदान)
  • विमान स्थान (प्रमाण व विश्लेषण)
  • शरीर स्थान (शरीर रचना)
  • इंद्रिय स्थान (इंद्रियांच्या लक्षणांची चिकित्सा)
  • चिकित्सा स्थान (रोग उपचार)
  • कल्पस्थान (औषध निर्मिती)
  • सिद्धी स्थान (उपचार सिद्धी)
  • चरक संहितेतील या आठ खंडांचे “मूलतत्त्व” त्रिदोष सिद्धांत, सप्तधातू सिद्धांत व प्रज्ञापरात यामध्ये आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोन

चरक संहितेमध्ये स्पष्टपणे नमूद आहे की “रोग हे केवळ एक शारीरिक गोष्ट नसून मानसिक, सामाजिक आणि नैतिक पातळीवरदेखील प्रभाव टाकतात.” आजचे आधुनिक मानसोपचारतज्ज्ञ जे म्हणतात, त्याचं मूळ आपण इथे शोधू शकतो. 

“मनाचा विकारांमुळे शरीर विकृत होते आणि शरीर विकृत झाला तर मन स्थिर राहू शकत नाही.” आधुनिक डॉक्टर्स  सुद्धा याचे उदाहरण देतात जसे की:—

1. जो माणूस सतत चिंता करतो, त्याला ऍसिडिटी होते.

2. जो माणूस सतत क्रोध करतो, त्याला रक्तदाब वाढण्याची शक्यता असते किंवा बऱ्याचदा त्याचा रक्तदाब वाढतो.

3. जो माणूस दुःखात,वेदनेत असतो त्याला भूक लागत नाही झोप लागत नाही.

चरक हे जाणून होते की शरीरावर उपचार करताना माणसाच्या, भाव-विश्वाकडे त्याच्या आयुष्याच्या शैलीकडे, लक्ष देणे गरजेचे आहे.

४. चरकांच्या विचारांचा भावनिक आणि मानवी पैलू

मन आणि शरीर – अतूट नातं

महर्षी चरक असं मानायचे की, “मन जर असंतुलित असेल, तर शरीरही दीर्घकाळ आरोग्य टिकवू शकत नाही.” या विचाराला त्यांनी सत्व, रज आणि तम या त्रिगुणांशी जोडले.

एक उदाहरण: जर एखाद्याचं मन सतत क्रोध, तणाव आणि भीतीने भरलेलं असेल, तर त्या व्यक्तीला जठरातील आम्लता, अपचन, डोकेदुखी यांसारखे त्रास अधिक प्रमाणात होत असल्याचं चरकांनी तपशिलात नमूद केलं आहे.

आहार आणि आरोग्य

आज “You Are What You Eat” असं म्हटलं जातं, पण हे सूत्र चरकांनीच शतकांपूर्वी मांडलं होतं. त्यांनी प्रत्येक ऋतूसाठी वेगळा आहार सांगितला आहे – ‘ऋतुचर्या’ आणि ‘दिनचर्या’ यांचा विस्तार त्यांनी सुंदरपणे मांडला आहे.

आहार:–“जेवण हे औषध आहे आणि चुकीचे जेवण म्हणजे रोग आहे.”

*सात्विक लवकर पचणारा ऋतू अनेक अनुकूल असा आहार रोजच्या जेवणात असावा.

* दिवसभराच्या खाण्याच्या वेळा ठराविक असाव्यात व प्रमाणात खाणे असावे.

* कफवर्धक पदार्थ रात्री खाणे टाळावे.

ऋतुचर्या व दैनाचर्यांचे पालन करताना महर्षी चरक कृषी सांगतात:–

*ग्रीष्म ऋतुतील आहार व व्यायाम वेगळा असतो.

* शरद ऋतूत वात वाढतो, म्हणून तूप व उष्ण पदार्थ अवश्य खावेत.

 *प्रत्येक ऋतूला अनुकूल असा आहार-विहार प्रत्येक व्यक्तीने घेतल्यास आजाराचे प्रमाण कमी होईल. 

* ऋतुचर्या दिनचर्या नियम पाळल्याने शरीर संतुलीत राहील.

५. चरकांचे, जीवन विज्ञान किंवा तत्त्वज्ञान – आरोग्य म्हणजे काय?

आहार, जीवनशैली आणि ऋतुचर्या यांचे पालन करणे म्हणजे– “जीवन-विज्ञान” होय. हेच तत्त्वज्ञान त्यांनी चरक संहितेत सांगितले आहे.

महर्षी चरक म्हणतात:
“आरोग्य म्हणजे केवळ रोगमुक्तता नव्हे, तर शरीर, मन, आत्मा आणि इंद्रियांची समरसता.”

त्यांचं आरोग्याविषयीचं परिभाषा ही आजही WHO (World Health Organization) च्या आरोग्यविषयक परिभाषेपेक्षा अधिक व्यापक आणि समर्पक वाटते.

६. चरक संहितेतील काही प्रमुख संकल्पना

संकल्पनाअर्थ / उपयोग
त्रिदोष सिद्धांतवात, पित्त, कफ या शरीरातील तीन मूलदोषांचे संतुलन
सप्तधातूरस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र – जीवनसत्त्व
ओजशरीरातील प्रतिकारशक्तीचे मूळ
प्रज्ञापराधबुद्धीचा अपराध म्हणजे चुकीचा आहार-विहार
रोगमूलमानसिक वर्तन, जीवनशैली आणि आहार हे रोगांचे खरे कारण

७. चरक आणि आजचं वैद्यक

आज जेव्हा आपण मानसिक आरोग्य, वैकल्पिक उपचार, डिटॉक्सिफिकेशन, योग आणि नैसर्गिक उपचारांविषयी बोलतो, तेव्हा आपण चरकांच्या मार्गावरच चाललो असतो. त्यांच्या संकल्पना आधुनिक विज्ञानाने आज मान्य केल्या आहेत.

  • Gut-Brain Connection – चरकांनी याविषयी २ हजार वर्षांपूर्वी लिहिलं आहे.
  • Lifestyle Disorders – चरक संहितेत प्रज्ञापराध व जीवनशैलीमुळे होणाऱ्या रोगांची चर्चा आहे.

8. औषध निर्मिती आणि उपचार तंत्र

चरकांनी औषधे तयार करण्याच्या पद्धती व त्यांचे संयोग, औषधाची मात्रा, गुणधर्म आणि उपयोग याविषयी अतिशय बारकाईने सांगितलेले आहे.

* वनस्पतींवर आधारित औषध

* धातू व खनिजांचे शोधन

* तेल, विविध प्रकारचा काढा/काढे, चूर्ण, वटी, लेप या स्वरूपातील उपचारहे सर्व प्रकार त्यांनी सांगितलेले आहेतच.

9. महर्षी चरकांचा वारसा

आज संपूर्ण जग आयुर्वेदाकडे एक शाश्वत, सेंद्रिय आणि भावनिक उपचारपद्धती म्हणून पाहतो. त्यातल्या मूलभूत विचारांचा पाया महर्षी चरकांनी रचला होता.

  • आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजेसमध्ये आजही “चरक संहिता” अभ्यासले जाते.
  • अनेक आयुर्वेदिक डॉक्टर्स चरकांच्या तत्वज्ञानावर आधारित उपचार देतात.
  • मन, शरीर आणि आत्म्याचे संतुलन ही आजही सर्वोत्कृष्ट उपचारपद्धती मानली जाते.

10. आजचे विज्ञान आणि चरक ॠषी

  • Gut-Brain Axis:–मन आणि पचनसंस्थेतील नातं स्पष्ट केला आहे. 
  • Preventive Healthcare:–त्यांनी रोग होण्याआधीच त्याची संभावना आणि त्यावर उपाय सांगितलेले आहेत.
  • Holistic Medicine:– शरीर मन आत्मा आणि निसर्ग यांचं एकत्रित संतुलन.

* आज जेव्हा ‘सस्टेनेबल हेल्थ-केअर, ‘होलिस्टिक वेलनेस’ ‘नॅचरल थेरपी’ यांचा बोलबाला आहे, तेव्हा चरकांचं नाव यशस्वीपणे पुन्हा पुन्हा उजळत राहते.

निष्कर्ष – मनाचा रोग, शरीरात जळतो!

महर्षी चरक हे केवळ एक प्राचीन ऋषी नव्हते, ते एक हृदयवेदक होते – ज्यांना माणसाच्या वेदना, भावना, भीती आणि इच्छा यांचा अचूक अंदाज होता. त्यांनी ‘रोग’ या संकल्पनेला एका शारीरिक अवस्थेपेक्षा अधिक मोठं स्वरूप दिलं – ते हीन विचारांचं, जीवनशैलीचं आणि मनोभूमिकेचं परिणाम मानत.

आजच्या यांत्रिक, द्रव्यकेंद्रित उपचारपद्धतीत त्यांच्या विचारांची गरज अधिक आहे. ते म्हणतात:

“तुमचा वैद्य हा तुमचा शिक्षक असावा, केवळ गोळ्या देणारा नव्हे.”

जर आपण चरकांच्या विचारांनी जगलो, तर आरोग्य हे केवळ एक शरीराचं अभाव नसून, एक आनंददायक, संपूर्ण आणि समरस जीवनशैली होईल.



Website |  + posts

Spread the love

Leave a Comment

Recommended
Top 5 Sole Survivor Stories in Aviation History — And…
Cresta Posts Box by CP
Index