नाते (हे एक झाड आहे याचे माझे नाते)

Spread the love

हे एक झाड आहे याचे माझे नाते

हे एक झाड आहे याचे माझे नाते
वाऱ्याची एकच झुळुक दोघांवरुन जाते


मला आवडतो याच्या फुलांचा वास
वासामधूने उमटणारे जाणीवओले भास


पहिल्यानेच याची मोहरतांना फांदी
ठेवली होती बाळगाणी याच्या कटिखांदी


मातीचे झाड : झाडाची मी: माझी पुन्हा माती
याच्या पानांवरच्या रेषा माझ्या तळहाती


ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल
रुजते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पैल


कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन
पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईन

कवियत्री – शांता शेळके


Spread the love

Leave a Comment

Recommended
मावळतीला गर्द शेंदरी मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले जसे कुणाचे…
Cresta Posts Box by CP
Index