मनाचे श्लोक

Spread the love

।।श्लोक।।
धरा श्रीवरा त्या हरा अंतरातें।
तरा दुस्तरा त्या परा सागरातेॅ।
सदा विसरा त्या भरा दुर्भरातें।
करा नीकरा त्या खरा मत्छरातें।।
भावार्थ:

भगवान शंकराने अत्यंत प्रेमाने ज्या श्रीहरीला आपल्या हृदयात धारण केले आहे, त्या श्रीहरीला आपणही आपल्या मनामध्ये विराजमान करावि. म्हणजे हा कठीण असा भवसागर पार करता येईल. पोट भरणे,आप-आपल्यालौकिक गरजा पूर्ण करणे, हे जरी महाकठीण कर्म आहे,तरी ते नेहमी आपण करावे व विसरून जावे; किंवा विसरायला शिकावे. मनातील मच्सराचापण निकराने नाश करावा.
समर्थ रामदास स्वामी.

।।श्लोक।।
बहु चांगले नाम या राघवाचें।
अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचें
करी मूळ निर्मूळ घेतां भावाचेॅ।
जीवां मानवां हें ची कैवल्य साचें।।
भावार्थ:

राम नाम हे फार चांगले आहे.
ते मोठे सुंदर, छोटे, सोपे व बिन खर्चाचे आहे.
त्यामुळे संसार तापाचा समूळ नाश होतो.
मानवी जीवांना रामनामामुळे स्वानंद मिळतो व मोक्ष मिळतो.

Website |  + posts

Spread the love

Leave a Comment

Recommended
                          गुड फ्रायडे हा दिवस येशू ख्रिस्तांच्या बलिदानाचा दिवस आहे. हा…
Cresta Posts Box by CP

Table of Contents

Index