तो पाऊस || To pausa

Spread the love

तो पाऊस


तो पाऊस तुझ्या आठवणींचा
डोळे पाणावून गेला
तो मातीचा सुगंध
मन हेलावून गेला.


सखे पावसाचं पाणी
आता जीव माझा घेई
कोण्या कुरूप जीवाला
पाखराचं रूप देई.


माझे मन सैरभैर
तू निवांत आसरा
तुझ्यामंदी माझा जीव
हा दुरावा नाही बरा.


पुन्हा पेईल पाऊस
पुन्हा तुझी आठवणं
माझ्या भेगाळल्या मनी
पावसाची साठवणं.

प्रशांत अनकर

Website |  + posts

Spread the love

Leave a Comment

Recommended
तू गेल्यावर फिके चांदणे. तू गेल्यावर फिके चांदणे, घर परसूही…
Cresta Posts Box by CP
Index